01:36pm | Dec 31, 2020 |
पुसेगाव: महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प.पू.श्री.सेवागिरी महाराजांचा दि. 2 जानेवारीचा रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रा न भरवता प्रशासकीय नियमानुसार यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सेवागिरी यात्रेतील सलग 10 दिवस असणारे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव व मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी दिली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुसेगाव (ता.खटाव) येथे सेवागिरी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, तलाठी गणेश बोबडे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात श्रीक्षेत्र पुसेगाव येथील ब्रम्हलीन तपोनिधी सिद्धहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या साजरा करण्यात येणार्या रथोत्सव सोहळ्यास लाखो भाविक पुसेगावात एकाच दिवशी हजेरी लावत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता असल्याने पुसेगाव येथे भरणारी पारंपरिक यात्रा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे लाखो भाविकांच्या उपस्थित साजरी होणारी सेवागिरी यात्रा काही नागरिकांच्याच उपस्थितीत अगदी साधेपणाने साजरी होणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |