12:03am | Nov 15, 2021 |
दुबई : दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले.
न्यूझीलंडच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला बाद केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. पण हा आनंद न्यूझीलंडसाठी जास्त काळ टिकला नाही. कारण त्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. बोल्टने यावेळी वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३८ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाला असला तरी मार्शने मात्र फटकेबाजी सुरुच ठेवत आपले अर्धशतकही साकारले.
न्यूझीलंड टॉस हरला आणि त्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. डॅरिल मिचेलने ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच ेचंडूवर षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. पण त्यानंतरच्या षटकात मिचेल ११ धावांवर बाद झाला. मिचेल बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आग ओकत असताना केन आणि सलामीवीर मार्टिन गप्लिल शांतपणे फलंदाजी करत होते. केनन ११ चेंडूंपर्यंत शांत राहीला आणि त्यानंतर त्याने मोठी फटकेबाजीला सुरुवात केली. यावेळ केनना गप्तिलही चांगली साथ देईल, असे वाटत होते. पण त्यामध्ये गप्तिल अपयशी ठरला. अॅडम झाम्पाने यावेळी गप्तिलला २८ धावांवर बाद केले आणि न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. गप्तिल बाद झाला असला तरी केनने मात्र आपला गिअर बदलला नाही. आजच्या सामन्यात केन हा वेगळाच फलंदाज असल्याचे दिसत होते. कारण केन एवढा आक्रमक खेळत असल्याचे यापूर्वी पाहिले नव्हते. पण केनने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस सचामार घेतला आणि न्यूझीलंडचा धावगती वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला. मिचेल स्टार्कच्या १६व्या षटकात तर केनने चक्क चार चौकार आणि एक षटकार वसूल केला. या एकाच षटकात केनने २२ धावा लुटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरही केन आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. केनने यावेळी ४८ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |