सातारा : सातारकरांना सातारच्या कारभाराची बारकाईने पाहणी करुन जिल्हाभर उपाययोजना राबविणारे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. परंतू, वर्षपूर्ती होवूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील बारनिशी विभागातील तुटलेल्या दरवाजाच्या कुलूपाकडे लक्ष देण्यासाठी आता विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कार्यालयातून येता-जाता एकदातरी पाहणी करावी, अशी मागणी बारनिशी विभागात पत्र देणार्या अभ्यागतांनी केली आहे.
‘गतिशील शासन, महाराष्ट्र शासन’ असा एकेकाळी सामान्य सातारकरांना अनुभव मिळत होता. परंतू यापूर्वीच्या जिल्हाधिकार्यांनी नियमात बदल करुन ‘शासकीय काम, पण काय देणार ते सांग’ या नवीन नियमाची अजूनपर्यंत चर्चा होत आहे. पण सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना योद्धा तसेच पारदर्शक काम करणारे अधिकारी म्हणून आपली प्रतिमा तयार केलेली आहे. पुनवडीसारख्या कोरोनाबाधित गावाला भेट देवून त्यांनी मानवतेचेही दर्शन घडवले. सकारात्मक ऊर्जा असणार्या या अधिकार्यांबद्दल चांगले बोलले जाते. त्यामुळेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन भवनकडे जाताना सरळ मार्ग सोडून जुन्या कार्यालयाच्या पाठिमागून जाणे पसंत केले. त्यावेळी पाठिमागे असणारी अस्वच्छता पाहून त्यांनी परिसर स्वच्छ राखण्याची सूचना केली होती. या आदेशाची अंमलबजावणीही झाली. तशाच पद्धतीने आता नूतन जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील बारनिशी विभागातील तुटलेल्या दरवाजाकडे लक्ष द्यावे. कारण गेली वर्षभर याठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून महत्त्वाची कागदपत्रे सादर केली जातात. यामध्ये काही गोपनीय कागदपत्रेही असतात. या दरवाजाचे कुलूप निघत नसल्याने गेल्यावर्षी कुलूपासह कडी-कोयंडाही कापण्यात आला होता. तो अद्यापही दुरुस्त झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात वारे आल्यानंतर सुट्टीच्या दिवशीही हा दरवाजा उघडाच राहतो. भविष्यात या विभागातील कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्वत: पाहणी करुन या विभागाच्या दरवाजास कडी-कोयंडा व कुलूप बसविण्यास विलंब का लागला? याची चौकशी करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातून होवू लागली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात देखभाल दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होवूनसुद्धा बारनिशी विभागाला जर कुलूप मिळत नसेल तर ती जिल्हा प्रशासनाची शोकांतिका आहे. याठिकाणी लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवर भेट देतात. पण त्यांना या दरवाजाच्या अवस्थेबाबत वस्तुस्थिती मांडावी, असे वाटत नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळेच वर्षपूर्ती होवूनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बारनिशीचा कडी-कोयंडा बसत नाही, याची आता चर्चा रंगू लागली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |