सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील मानस हॉटेल समोर भरधाव दुचाकी डिवाइडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कराड येथील २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि.६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
शिवम राजेश काटवटे वय २३ रा, कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम काटवटे हा कराड येथील वीज वितरण कार्यालयामध्ये विद्युत सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याची पुण्याला परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी तो दुचाकीवरून पुणे येथे गेला होता. बुधवारी दुपारी तो परीक्षा झाल्यानंतर पुण्यातून दुचाकीवरून घरी येण्यासाठी निघाला. सातारा शहराजवळ आल्यानंतर मानस हॉटेलनजीक भरधाव दुचाकी डीवाईडरला धडकली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शिवम या तरुणाला क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |