01:24pm | May 26, 2022 |
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढेच नव्हे तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी लागणारे १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आलेले नाही.
अर्ज भरताना ही परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजे यांना कितपत पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. तेव्हाच संभाजीराजे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
मी फक्त जनतेशी बांधील : संभाजीराजे
तत्पूर्वी संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे.मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणकू होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, दोन जागांवर भाजप तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर सहजपणे निवडून येऊ शकतात. त्यानंतरही सहावी जागा रिक्त होती. ही जागा एकहाती जिंकण्यासाठी भाजप किंवा महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला होता. या जागेवर निवडून येण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मला सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते.
आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली
त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |