08:41pm | Jan 16, 2021 |
सातारा : भुईंज, ता. वाई येथील हॉटेल व्यवसायिक ओंकार चव्हाण यांच्या खून प्रकरणातील तीन फरार संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. अक्षय संजीव जाधव (वय 21), जयेश उर्फ बंटी शामराव मोरे (वय 32), वरुण समरसिंग जाधव (वय 23, सर्व रा. भुईंज, ता. सातारा) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज, ता. वाई येथील हॉटेल व्यवसायिक ओंकार चव्हाण हे दि. 4 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. त्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात दि. 6 जानेवारी रोजी तशी तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास करीत असताना ओंकार चव्हाण यांचे अपहरण करुन, त्यांचा खून करुन मृतदेह जाळून टाकला असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. पथकाने तात्काळ या खून प्रकरणातील चार संशयितांना ताब्यात घेवून खुनाचा गुन्हा उघड केला होता. याच गुन्ह्यातील आणखीन दोन संशयितांचा शोध घेत असताना याच गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. दि. 15 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती प्राप्त झाली की, या खून प्रकरणातील फरार संशयितांपैकी तीनजण वेळापूर, जि. सोलापूर येथे लपून बसलेले आहेत. या माहितीच्या आधारे सहा.पो. निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्त्याखाली पथक स्थापन करुन ते रवाना करण्यात आले होते. दि. 15 रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास साळमुख चौक, वेळापूर येथे सापळा लावला असता ते तिघे त्यात अलगद अडकले. ह्युंडाई कार क्र. (एमएच 11-एडब्लू 1476) सह त्यांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी भुईंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, स.फौ. उत्तम दबडे, पो. हवा. अतिष घाडगे, संजय शिर्के विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला यांनी केली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |