01:27pm | Nov 27, 2020 |
पुसेगाव: शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत लढा देऊन संघर्ष करणारे तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी नाविण्यपूर्ण प्रयोग राबवणारे प्रा.जयंत आसगावकर यांनी शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. तर अरुण लाड हे देखील अभ्यासू व्यक्तीमत्व असून सतत विकासाचा ध्यास, धडपड तसेच कार्यक्षमतेबरोबर सर्व सामान्यांना बरोबर घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची पद्धत आहे. महाविकास आघाडीचे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड उमेदवार असून दोघेही अभ्यासू व प्रभावी असल्याने त्यांचा विजय निश्चित असून त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ व रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक सहविचार सभेत व्यक्त केला.
यावेळी प्रा. सुहास चौगले यांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्याची ओळख करून दिली. श्री सेवागिरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले, एस.बी.जाधव, डॉ.संजय क्षिरसागर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने या उमेदवारांना पूर्ण ताकत देऊन विजयी करण्याची मनोगते व्यक्त केली. डी.एन. गोफणे यांनी आभार मानले.
पर्यवेक्षक सुधाकर माने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यकमास प्रा. सुहास चौगुले, सुरेश लंगडे, प्रा.संध्या चौगुले, डॉ.संजय क्षिरसागर, एस.बी.जाधव, समिर फकीर, दत्तात्रय गोफणे, सुधाकर माने तसेच जांब, जाखणगाव, राजापूर, पुसेगाव येथील शिक्षक उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |