सातारा : सातारा शहरात एक दाम्पत्य विनापरवाना व मूळ किंमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री करण्यासाठी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रशांत दिनकर सावंत (वय 29), सपना प्रशांत सावंत (वय 25) दोघेही रा. पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर, पन्हाळे निवास, मंगळवार पेठ, सातारा असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोना बाधित व्यक्तींसाठी उपचार साठी वापरले जाणार्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल त्यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाला अशा घटनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा विशेष शाखेला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना दि. 10 रोजी समर्थ मंदिर परिसरात शंकर-पार्वती गिरण घाणेकर चौक या ठिकाणी चैतन्य किराणा दुकानासमोर प्रशांत दिनकर सावंत (वय 29), सपना प्रशांत सावंत (वय 25) हे दाम्पत्य 8.30 वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररित्या विनापरवाना व मूळ विक्री पेक्षा अधिक किमतीला रेमडीसिवीर इंजेक्शन घेऊन जाताना आढळून आले.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांना बोलावून पोलिसांनी पुढील कार्यवाही केली. अरुण गोडसे यांच्या फिर्यादीवरून या दाम्पत्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन रेमडीसिवीर इंजेक्शनसह एक दुचाकी असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, जयवंत खांडके, अश्विनी बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल तेजल कदम, सुमित मोरे, निलेश बच्छाव, अनिकेत अहिवळे, राहुल वायदंडे सहभागी झाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |