03:37pm | Dec 05, 2021 |
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) यंदाच्या विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा जाहीर केल्या आहेत. एमपीएससी राज्य सेवा पूर्वपरीक्षा येत्या 2 जानेवारी 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे दरम्यान घेण्यात येणार आहे.
या परीक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच 2022 ची राज्य सेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 2021 वर्षाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा दि. 2 जानेवारी 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी असेल.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा 16 एप्रिल 2022 ला होणार असून मुख्य परीक्षा 3 जुलैला होणार आहे, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्वपरीक्षा 26 फेब्रुवारी 2022 तर मुख्य परीक्षा 9 जुलै ते 31 जुलैदरम्यान पार पडणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वपरीक्षा 12 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा 2 जुलैला पार पडणार आहे. महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 3 एप्रिल तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान तसेच महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल आणि मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. वर्ष 2022 साठी होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा 19 जूनला तर मुख्य परीक्षा 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक एमपीएससीच्या https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध असून आयत्या वेळी परीक्षेच्या तारखांत होणाऱ्या बदलांविषयी वेबसाईटच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांना कळविण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |