03:29pm | Nov 21, 2020 |
सातारा: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (सहकार सेल) प्रदेश सचिव नियुक्ती नंतर सोळशी गावातले ग्रामस्थांनी अंकुश रा.जाधव यांचा जाहीर सत्कार केला. याप्रसंगी बाळासाहेब सोळस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व पक्षाची विचारधारा यासंबंधी उपस्थितांना संबोधित केले, तसेच गावच्या विकासामधील जाधव यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली लवकरच त्यांना नवीन जबाबदारी देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
सामान्य कुटुंबातील व्यक्तीची निवड झाल्याबद्दल कौतुकही केले. प्रमोद सोळस्कर यांचेही यावेळी भाषण झाले व अंकुश जाधव यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्वासित केले. सत्काराला उत्तर देताना अंकुश जाधव यांनी आतापर्यंत झालेला त्यांचा जीवन प्रवास याचे वर्णन केले व सहकारी चळवळीचे ग्रामस्थांना महत्त्व पटवून दिले. सहकाराच्या माध्यमातून लोककल्याण साधले जाते व याचा सामान्य वर्गाची उन्नती व यामधून राज्याचा विकास होण्यासाठी निश्चितच फायदा होण्यास मदत होईल. सामान्य नागरिकांनी लोकहितासाठी सहकारी तत्वानुसार कामकाजाची पद्धती अवलंबावी.नवीन संस्थांची निर्मिती करावी असे सूतोवाच केले व सर्व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
संतोष यादव कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, प्रमोद सोळस्कर, सोळशी गावचे सरपंच बाळासाहेब यादव, सरपंच ज्ञानेश्वर यादव (माऊली), विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब यादव व सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बबनराव देशमुख, प्रगतशील शेतकरी चांगदेव (आप्पा) यादव, भरत आनंदराव यादव, सतीश देशमुख, उपसरपंच किरण (काका) कुंभार-राजे, विकास सोसायटी चेअरमन देशराज (आबा) यादव, विकास सोसायटी सदस्य शामराव यादव (गुरुजी), अभयसिंग (भाऊ) यादव, शरद शिंदे (दाजी), सातारा जि. राष्ट्रवादी काँ युवक सरचिटणीस जीवन सोळस्कर, विकास सोसायटी चेअरमन केशव पवार, उपसरपंच नवनाथ ताटे, भगवान (अण्णा) यादव, जवाहर (बापू) यादव, उपसरपंच संभाजी खादगे, मधुकर जाधव, सोळशी गावचे ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय ग्रामस्थ व तरुण युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय (बाबा) सोळस्कर यांनी केले होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |