02:44pm | Sep 29, 2020 |
पुसेगाव : खटाव तालुक्यातील कोविड बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावे त्यांचा वेळ व पैसा वाचावा या सामाजिक जाणिवेतून ललगुण, राजापुर, वर्धनगड, जाखणगाव, कटगुण केंद्रातील शिक्षकांनी व समाज प्रेमी लोकांनी एकत्र येऊन पुसेगाव कोविड सेंटरला 10 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले आहे. या ऑक्सिजन मशीन रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरेल, असे गौरवोद्गार जि.प.उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले.
पुसेगाव कोविड सेंटरला शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी लोकवर्गणीतून दिलेल्या पोर्टेबल ऑक्सिजन मशीन लोकार्पण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, माजी उपसरपंच रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनिस शेख, डॉ. अंबादास कदम, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, जयश्री चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल फडतरे, अंकुश शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती.
प्रदीप विधाते म्हणाले, पुसेगाव बुध बीटातील शिक्षकांनी व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या लोकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून पुसेगाव कोविड सेंटरला दहा ऑक्सिजन बेडचे सुविधा निर्माण करून दिली आहे. या सुविधेमुळे खटाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल. यातून अनेक कोरोना बाधित रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने पुसेगाव कोविड सेंटरला तीस फाउंडर बीडचे व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये आरोग्य विभागाकडून चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. आगामी काळात आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांना अडचण येणार नाहीत त्यादृष्टीने दक्षता घ्यावी.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे म्हणाले, सध्या कोरोनाच्या अधिक संक्रमणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच यंत्रणा आपआपल्या परीने या संकटाच्या काळामध्ये मदत करीत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता व्हेंटिलेटर व ऑक्सीजन बेडची व्यवस्था अपुरी पडत आहे. ललगुण, राजापूर, वर्धनगड, जाखणगाव कटगुण केंद्रातील शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून समाजाच्या प्रति आपण उत्तरदायित्व लागतो या नात्याने केवळ तीन दिवसाच्या कालावधीत अडीच लाख निधी लोकवर्गणीतून जमा केली. या निधीतून पुसेगाव कोविड सेंटरला 10 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या महत्वपूर्ण कामामुळे खटाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यास अधिक मदत होणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात शिक्षिकांनी लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागासाठी दिलेले योगदान अधिक मौल्यवान आहे.
यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, माजी उपसभापती संतोष साळुंखे, माजी उपसरपंच रणधीर जाधव, डॉ. अंबादास कदम, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, विजय गोरे, बंडोबा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल फडतरे सूत्रसंचलन अजित चव्हाण तर आभार विष्णू पाचांगणे यांनी मानले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |