03:38pm | Sep 24, 2022 |
वडूज : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज ता खटाव येथे भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरेंच्या आदेशानुसार सेवा पंधरवडा रक्तदान शिबीर संपन्न झाले, यावेळी खटाव तालुक्यातील तरसवाडी ते डिस्कळ पर्यतच्या विविध क्रीडा मंडळ, सार्वजनिक उत्सव व भाजप कार्यकर्त्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
अक्षय ब्लड बँकेच्यावतीने डॉ रुपाली मोरे, प्रकाश कानुरे, श्वेता वायदंडे, मंजुषा मोहिते, ज्ञानेश्वर बाटे, मयुरा कुपवाडे, शिध्राप्पा मुगली, मनाली वांडरे, शिवम काटकर, अजय सदामते, अली पकाली यांनी रक्तदात्यांच्या रक्ताच्या बॅगेचे संकलन केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजप खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, अनिल माळी, वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे, आर. पी. आय. जिल्हा उपाध्यक्ष कृणाल गडांकुश,जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत पाटोळे, सचिन माळी, चंद्रकांत कोकाटे, सॊमनाथ भोसले, बनाजी पाटोळे, गणेश चव्हाण, विशाल बागल, प्रा. सदाशिव खाडे, दादा धोंडी जगताप व भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खटाव पंचायत समितीच्या बचत भवनात झालेल्या रक्तदान शिबिरात पाचशे रक्तदात्यांचे नियोजन करण्यात आले होते अशी माहिती भाजप पदाधिकारी यांनी दिली होती. दुपारपर्यंत सुमारे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले आहे. यामध्ये चैताली देवकर, माधुरी माने सह विद्यार्थी व युवतींचाही रक्तदान शिबिरात सहभाग लक्षणीय दिसून आला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रोत्साहनपर टी शर्ट व पुष्पगुच्छ,चहा पान करून सत्कार करण्यात आला. सकाळी साडे नऊ ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी गर्दी केली होती. यावेळी काहींना अशक्तपणा व अतिश्रमाने चक्कर आली होती. त्यांची भाजप कार्यकर्त्यानी मनापासून काळजी घेतली तसेच त्यांच्या उत्साहाला सलाम केला.
खटाव तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल श्री चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. आ.जयकुमार गोरे हे या रक्तदान शिबिराला भेट देणार असल्याचे फलक व माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली पण, दुपारी तीन वाजले तरी रक्तदान शिबिराकडे ते फिरकले नाहीत. त्यामुळे युवक वर्गाची काही अंशी निराशा झाली असली तरी लवकरच आ.जयकुमार गोरे हे वडूज नगरीत येऊन सर्वांचे आभार मानतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, स्वतः नगरसेवक यांनी ही रक्तदान करून कर्तव्य बजावले त्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले. यावेळी खटाव पंचायत समितीचे कर्मचारी तुकाराम खाडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |