02:09pm | Jun 30, 2022 |
उदयपूर : भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल 28 जून 2022 रोजी उदयपूरमधील कन्हैया लाल या टेलरचा कट्टरतावादी रियाझ जब्बार आणि गौस मुहम्मद यांनी शिरच्छेद केला. आता या गरीब मृत टेलरच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भाजप नेते कपिल मिश्रा यांनी निधी उभारला आहे. 24 तासांच्या आत 1 कोटी जमा करण्याचे लक्ष्य त्यांनी पूर्ण केले. कन्हैय्या लालच्या कुटुंबासाठी अजूनही मदत येत असल्याने, निधी उभारणीसाठीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित आहे. लवकरच 1.25 कोटी जमा होतील, असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राजस्थानमधील उदयपूरमध्ये एका गरीब टेलरची क्रूरपणे हत्या केल्याची बातमी देशात वेगाने पसरली. घटनेचा व्हिडिओ आणि मारेकऱ्यांची साक्ष व्हायरल झाल्यामुळे, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. निधी संकलन मंच क्राउडकॅशवर निधी उभारला गेला आहे.
दुसरीकडे, लोकांना देणगी देण्याचे आवाहन करण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "कन्हैया लालजींची धर्माच्या नावावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. या परिस्थितीत आपण त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. कैन्हय्या लाल यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे लक्ष ठेवले आहे. मी स्वतः कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हा निधी सुपूर्द करीन. देशवासीयांना या कारणासाठी देणगी देण्याचे मी आवाहन करतो."
तसेच, कपिल मिश्रा यांनी कन्हैया लाल यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कपिल मिश्रा यांनी ट्विट म्हटले की, 'कन्हैया लालजी यांचा मुलगा यश यांच्याशी माझी नुकतीच चर्चा झाली. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.'' त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ''या परिवाराचे आपण सर्व ऋणी आहोत. कन्हैया लालजींच्या सर्वोच्च बलिदानाला जगभरातील हिंदू समाज नमन करतात. त्यांच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडू इच्छित नाही. यश हा एका शूर वडिलांचा तेजस्वी मुलगा आहे."
दुसरीकडे, 1 कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर, कपिल मिश्रा यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आणि त्याच ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 'कन्हैया लालला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ईश्वर सिंहला 25 लाख रुपयांची मदत निधी दिला जाईल.'
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |