01:12pm | Dec 02, 2020 |
कॅनबेरा: व्हॉईट वॉश टाळण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या टिम इंडियाने अखेर आश्वासक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये कांगारूंची धुलाई करत हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेच्या जोडीने टिम इंडियाचे सामन्यात पुनरागमन करून दिले. हार्दिक पांड्याने 76 चेंडूत 92 धावा करताना 7 चौकार आणि एक षटकार लगावला तर रविंद्र जाडेजाने 50 चेंडूत 66 धावा करताना 5 चौकार तर तीन षटकार लगावले. या जोडीने केलेल्या कामगिरीमुळे भारताने विजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे 303 धावांच आव्हान उभे केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामन्यात अखेर टिम इंडियाला सुर गवसल्याचे दिसून आले. यजमान ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्याने भारतासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर तिसर्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 302 अशा आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
व्हाईवटॉश टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यासाठी 4 बदल केले, परंतू आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचं सत्र या सामन्यातही सुरुच राहिलं. विराट आणि पांड्याने संयमी खेळ करत भारताची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत पांड्या-जाडेजा जोडीने भारताला दमदार पुनरागमन करुन दिलं. पांड्याने नाबाद 92 तर जाडेजाने नाबाद 66 धावा केल्या.
मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुबमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले.
एककीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. आपलं अर्धशतक झळकावत विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना केला. परंतू जोश हेजलवूडने विराटला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला, त्याने 63 धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा जोडीने पुन्हा एकदा संयमी खेळ करत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हार्दिकने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने 2 तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
शिखर धवन 27 चेंडून 16 धावा 2 चौकार
शुभमन गिल 39 चेंडूत 33 धावा 3 चौकार 1 षटकार
विराट कोहली 78 चेंडूत 63 धावा 5 चौकार
श्रेयस अय्यर 21 चेंडूत 19 धावा 2 चौकार
लोकेश राहुल 11 चेंडूत 5 धावा 2 चौकार
हार्दिक पांड्या 76 चेंडूत 92 धावा 7 चौकार 1 षटकार
रविंद्र जडेजा 50 चेंडूत 66 धावा 5 चौकार 3 षटकार
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |