10:59pm | Oct 16, 2020 |
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी 264 बाधितांची नोंद झाली, तर 7 बाधितांचा मृत्यू झाला. तसेच 925 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 509 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाची लाट ज्या वेगाने पसरली, त्याचप्रमाणे ही लाट ओसरत चालल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आरोग्याविषयीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले तर अजून बाधितांचा आकडा कमी येवू शकतो. शुक्रवारी जिल्ह्यात 264 बाधितांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा 43 हजार पार म्हणजेच 43 हजार 233 वर पोहोचला आहे. तर, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या तब्बल 925 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 35 हजारांचा आकडा पार करीत 35 हजार 699 वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 5 हजार 855 बाधितांवर उपचार सुरु आहेत. तसेच 7 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1 हजार 455 वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी 509 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
7 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या खिंडवाडी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, चौर खेड ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कळंबे ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष, अदित्यनगरी ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ पोवई नाका ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, वाडे ता. सातरा येथील 69 वर्षीय पुरुष, अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
509 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 58, कराड येथील 18, फलटण येथील 8, कोरेगाव येथील 95, वाई येथील 18, खंडाळा येथील 40, रायगाव येथील 45, पानमळेवाडी येथील 53, मायणी येथील 6, महाबळेश्वर येथील 10, पाटण येथील 40, दहिवडी येथील 8, तळमावले येथील 24, पिंपोडा येथील 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 79 असे एकूण 509 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |