सातारा : तळबीड, ता. कराड येथील महेंद्र शंकर वाघमारे (वय ४७) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात तळबीड पोलिसांना अवघ्या सहा तासांत यश आले. गावातील लोकांना खोटी माहिती देतो, या कारणावरून महेंद्र वाघमारे यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दिलीप मारुती साळुंखे (रा. तळबीड, ता. कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र वाघमारे यांचा शुक्रवारी रात्री अज्ञाताने गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. यानंतर तळबीड पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी त्याच गावातील दिलीप साळुंखे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
महेंद्र वाघमारे हे मारुती मंदिरामध्ये बसले होते. त्यावेळी दिलीपने गावातील लोकांना माझ्याबद्दल खोटी माहिती का देतो, याचा जाब विचारला. तेव्हा वाघमारे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चिडून जाऊन दिलीप साळुंखे याने वाघमारे यांचा मंदिरात असलेल्या झेंड्याच्या कापडाने गळा आवळला. त्यानंतर चाकूने छातीवर, पोटावर वार करून त्यांचा खून केला. न्यायालयाने दिलीप साळुंखे याला ४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. आर. वरोटे, फाैजदार जी. आर. बाकले, एस. एम. पिसाळ आदींनी ही कारवाई केली. या पथकाने गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे काैतुक केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |