12:40pm | Nov 25, 2022 |
कराड : वनवासमाची, ता. कराड येथे उसाच्या फडात आढळलेल्या तिन्ही बछड्यांना मादी बिबट्याने आपल्या सोबत नेले. वन विभागाच्या प्रयत्नामुळे तसेच ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मादी बिबट्याची तिच्या बछड्यांशी पुनर्भेट झाली. हा पुनर्भेटीचा क्षण वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैदही झाला.
कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे जयवंत यादव यांच्या माळ नावाच्या शिवारात सोमवारी दुपारी ऊसतोड सुरू असताना मजुरांना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. मजुरांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला कळविले. माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, श्रीनाथ चव्हाण, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अरविंद जाधव, सचिन खंडागळे, अभिजीत शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. तसेच परिसर निर्मनुष्य केला.
बछड्यांना एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे मादी बिबट्याने तेथून एका बछड्याला नेले. तर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या बछड्यालाही मादी तेथून घेऊन गेली. कॅरेटमध्ये एकच बछडा राहिला असताना पुन्हा एका तासाने मादी बिबट्याने तेथे येऊन तिसऱ्या बछड्यालाही जबड्यात पकडून तेथून नेले. यादरम्यान अनिल कांबळे, शंभूराज माने, योगेश बडेकर, हणमंत मिठारे या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |