01:32pm | Dec 29, 2020 |
मेलबर्न : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभावाची सव्याज परतफेड करत टीम इंडियाने मालिकेत दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत खडतर परिस्थितीचा सामना करत ‘अजिंक्य’ नेतृत्वाची झलक दिसून आली. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत 8 विकेट राखून बाजी मारल्याने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. टीम इंडियाने मिळवलेल्या या धमाकेदार विजयात कर्णधार अजिंक्य रहाणेचं पहिल्या डावातील शतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्ट्य ठरली.
तिसर्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने 6 बाद 133 पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने काही काळ मैदानावर तग धरला परंतू अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 45 धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव 200 धावांवर संपवला. दुसर्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने 3, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 तर उमेश यादवने 1 बळी घेतला.
भारतीय़ गोलंदाजांच्या आक्रमक मार्यामुळे भारताला मिळालेल्या माफक आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाची दुसर्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसर्या डावातही अवघ्या 5 धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर चेतेश्वर पुजारीला 3 धावा करून माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |