09:15pm | Dec 14, 2020 |
वाई : मोबाईल खरेदी व्यवहारात गुगल पे द्वारे पैसे घेवून मोबाईल न देता मोबाईल स्विच ऑफ करून सुमारे 65 हजार रूपयांना गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक पध्दतीने केलेल्या या गुन्ह्यातील संशयिताला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुख्य संशयित किरण गणपती गायकवाड (वय 35 वर्षे) सध्या राहणार उत्तरेश्वरनगर, लेन नंबर 6, लोहगाव पुणे मुळ रा. संगमेश्वरनगर, सुतमीलसमोर, अक्कलकोट रोड सोलापूर जि.सोलापूर व त्याचा साथीदार गणेश अशोक भालेराव रा. पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादी ईम्रान शफी सय्यद यांना दि.24 नोव्हेंबर रोजी अज्ञात इसमाने फोन नंबर 7058859120 वरुन आय फोन 12 प्रो 128 जीबी चा मोबाईल खरेदीचा व्यवहार करण्यासाठी गुगल पे व्दारे पैसे पाठविणेस सांगितले. फिर्यादीने त्याच्या भावाच्या बँक ऑफ इंडियाचे अकाऊन्ट नंबर 130030110000026 वरील गुगल पे ला लिंक असलेला मोबाईल नंबर अज्ञात आरोपीस पाठविला. आरोपीने त्याचे गुगल पे अकाऊन्टवरुन हाय मॅसेज करुन फिर्यादीस 65,000/- रु पाठविण्यास सांगितले. पैसे मिळताच संशयिताने फोन स्विच केला. सदर मोबाईल खरेदी प्रकरणी आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने अज्ञाताविरोधात गुन्हा रजि. दाखल केला.
सदरचा गुन्हा मोबाईलब्दारे तांत्रीक पध्दतीने केला असल्याने पो.नि. आनंदराव खोबरे व त्यांचे सह कर्मचारी यांनी सदरचा गुन्हयाचा तपास कसून करणेस सुरुवात केली. गुन्हयाचे वेळी अज्ञात आरोपी याने वापरलेला मोबाईल बंद केलेने गुन्हयाचा तपास करणे अवघड झाले होते. परंतु आरोपीने फसवणुक कश्या प्रकारे केली आहे. याची पूर्ण माहिती काढून आरोपीचा शोध घेणेकामी खास पथक तयार करुन आरोपीचा पुणे येथे जावून शोध घेवून आरोपी किरण गणपती गायकवाड (वय 35, सध्या रा. उत्तरेश्वरनगर, लेन नंबर 6, लोहगाव पुणे. मुळ रा. संगमेश्वरनगर, सुतमीलसमोर,अक्कलकोट रोड सोलापूर जि.सोलापूर) यास शिताफीने पकडले आहे. आरोपीने हा गुन्हा त्याचा साथीदार आरोपी गणेश अशोक भालेराव रा. पुणे याचे समवेत केला असल्याचे कबुल केले आहे. आरोपी किरण गणपती गायकवाड यास दि.12 डिसेंबर रोजी अटक केली आहे.
आरोपीने गुन्हयात वापरलेला मोबाईल व फसवणुक केलेली रक्कम 65,000/- आरोपीकडून हस्तगत केली आहे. या आरोपीने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबतचा तपास चालू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि. खोबरे, सहा.पो.फौजदार पवार, सहा.पो.फौजदार शिर्के, पो.कॉ. बल्लाळ, पो. कॉ. राठोड, पो.कॉ. निंबाळकर यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईबाबत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई तानाजी बरडे यांनी अभिनंदन केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |