नवी दिल्ली : बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच उरकून घ्या. कारण उद्यापासून म्हणजे शनिवारपासून सलग चार दिवस बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. दरम्यान, येत्या शनिवार-रविवार बँकेला सुट्टी आहे. यानंतर येत्या सोमवार आणि मंगळवारी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे कर्मचारी संपावर जात आहेत.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, बँक युनियनच्या संपामुळे 28 मार्च आणि 29 मार्च रोजी बँकेच्या कामकाजावर परिणाम होईल. हा संप खाजगीकरणाच्या विरोधात केला जात आहे. तसेच, या काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,.
एटीएममधून पैसे काढताना अडचण येणार
या चार दिवसांत बँकेत कोणतेही काम न झाल्यास बँकेची एटीएमही रिकामे होऊ शकतात, असे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये, जेथे थर्ड पार्टी पैसे भरतात, तेथे कोणतीही अडचण येणार नाही. परंतु ज्या एटीएममध्ये बँकेचे कर्मचारी पैसे भरण्याचे काम करतात, त्या एटीएममध्ये रोकड संपू शकते, असे बँक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ संप
विशेष म्हणजे, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या संपात बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. मात्र, संपाच्या काळात कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आश्वासन बँकांनी दिले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |