सातारा : चौधरवाडी, ता. फलटण येथील दत्तनगर भागात बेकायदा जमाव जमवून मागील गुन्हा काढून घेण्याच्या कारणावरून तलवार व चाकूच्या साह्याने 8 जणांनी मिळून एकाचा खून करून, कुटुंबातील इतर तिघांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपाचा गुन्हा 8 संशयीतांविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी 4 संशयीतांना ताब्यात घेतल आहेे.
शुक्रवारी, दि. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास दत्तनगर, चौधरवाडी, ता. फलटण येथे बिलटया नामदेव शिंदे, कुणाल बिलटया शिंदे, रोशन एडिशन भोसले, तिघे रा. कापशी, ता. फलटण रेबन्या शिवा काळे, चैत्या रेबन्या काळे, दोघे रा. घाडगेवाडी, ता. फलटण, विष्णू अशोक भोसले, परश्र्या अशोक भोसले, रोहित आशा भोसले, रा. महादेवनगर, सस्तेवाडी, ता. फलटण यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पकुर्डी टरंग्या भोसले यांच्या घराकडे पळत आले. त्यावेळी पकुर्डी भोसलेच्या मालकांनी, तुम्ही का पळता? असे विचारले असता, फिर्यादीचे मालक टरंग्या भोसले यांना बिलटया शिंदे याने तलवारीने मारहाण केली व म्हणाला, तुम्हाला केस काढून घ्या, किती वेळा सांगितले. फिर्यादी पकुर्डी यांच्या डोक्यात, मुस्कान हिला तलवारीने व फिर्यादीचा मुलगा प्रभु टरंग्या भोसले यांच्या गळ्यावर रोशन भोसले याने चाकूने वार केला व इतर इसमांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. त्यात प्रभु टरंग्या भोसले गंभीर जखमी होऊन, मयत झाला असून कुटुंबातील पकुर्डी टरंग्या भोसले, टरंग्या आंबू भोसले व मुस्कान प्रभू भोसले हे गंभीर जखमी झाले असल्याचे पकुर्डी टरंग्या भोसले हिने फिर्यादित नमुद केले आहे.
फिर्यादीवरून वरील 8 जणांच्याविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली आहे. बिलटया नामदेव शिंदे, कुणाल बिलटया शिंदे, रेबन्या शिवा काळे, चैत्या रेबन्या काळे या संशयीतांना पहाटे कापशी येथून ताब्यात घेतले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |