सातारा : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून म्हसवड येथे औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करुन घेत त्याचा अपहार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
प्रमोद पांडूरंग सपाटे (रा.इचलकरंजी), नितीन बाबूराव गाट (रा. बागल चौक, कोल्हापूर), प्रशांत श्रीकांत बडवे (रा. हातकणंगले जि.कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सातारा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हसवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी 30 मे 2019 साली गुन्हा दाखल झालेला आहे. राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था मर्यादित म्हसवड ता.माण या नावाने संस्था असून त्याचे चेअरमन, संचालक यांनी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून औद्योगिक प्रकल्पासाठी 1 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. पैसे मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये घोटाळा करुन पैसे हडप केले. 52 आठवड्यात प्रकल्प पूर्ण करण्याची शासनाची अट होती. मात्र कोणतेही काम त्यांनी केले नाही. लेखापरीक्षणामध्ये ही बाब समोर आल्यानंतर संशयितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत होते. दि. 23 रोजी संशयितांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी भोसले करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |