सातारा : चंदननगर परिसरात जानाई मळाई नजिक असलेल्या एका वस्तीतील बंगल्यासमोर अर्धवट जळालेल्या स्थितीतील धड नसलेले शिर दुपारी 12 च्या सुमारास आढळून आले. ही घटना निदर्शनास येताच नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. हे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील शिर कोणाचे हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. हे मुंडके कुत्र्यांनी आणून टाकल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान चंदननगर परिसरात जानाई मळाईनजिक असलेल्या वस्तीवरील बंगल्यासमोर जळालेल्या अवस्थेतील मानवी शिर कुत्र्यांनी आणून टाकले होते. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने ही घटना सातारा शहर पोलीस ठाण्याला कळवली.
शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी तातडीने कर्मचारी व डॉग स्कॉडसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मानवी शिर आढळून आले. सोबत असलेल्या डॉग स्कॉडमधील कुत्र्यांना वास देण्यात आला. मात्र, काही अंतरावर कुत्रे थांबले. पुढे काही माग काढता आला नाही. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मुंडके ताब्यात घेतले. आता हे नेमके हे मुंडके कोणाचे ? हा नक्की काय प्रकार असावा, कोणाचा खून तर झाला असावा की काय अशी अनेक प्रश्न चिन्ह समोर उपस्थित झाली आहे. मात्र, मुंडके परिसरातून हलवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |