11:02am | Sep 09, 2022 |
वॉश्गिंटन : पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेने ४५ कोटी डॉलर्सचे (जवळपास ३५ अब्ज ८७ कोटी ६२ लाख ५० हजार रुपये) अर्थसहाय्य मंजूर केले आहे. पाकला दहशतवादाच्या विद्यमान व भविष्यातील धोक्यांना तोंड देता यावे यासाठी बायडेन प्रशासनाने ही मदत देऊ केली असून, गेल्या चार वर्षांत अमेरिकेकडून पाकला मिळणारे हे पहिले मोठे सुरक्षा सहाय्य आहे. बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर भारताने सावध मौन बाळगले आहे. अमेरिकेने याबाबत भारताला अधिकृतरित्या माहिती दिली अथवा नाही, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.
पाक सरकार अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्कसह त्यांच्या आश्रय स्थळांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याने बायडेन यांचे पूर्वपदस्थ डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये पाकचे दोन अब्ज डॉलरचे सुरक्षा सहाय्य निलंबित केले होते.
पाकला एफ-१६ लढावू विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे एफ-१६ चे भाग व संबंधित उपकरणांच्या संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या साहाय्यामुळे पाकची दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेची क्षमता अबाधित राखण्यास मदत होईल, असा युक्तिवाद अमेरिकेने केला आहे.
पाकला एफ-१६ ताफ्याच्या देखभालीसाठी संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा आपण निर्णय घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अमेरिकी संसदेला देण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार प्रस्तावित विक्रीत कोणत्याही नव्या क्षमता, शस्त्रे अगर युद्धसामग्रीचा समावेश नाही.
पाकने विमानांचा दहशतवाद्यांविरोधात वापर करावा
अमेरिकी सरकारने संसदेला प्रस्तावित विदेशी लष्करी विक्रीची माहिती दिली आहे. पाक दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वपूर्ण साथीदार असून, पाकच्या हवाई दलाला एफ - १६ ताफ्याची देखभाल करता यावी यासाठी हे साहाय्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकचा एफ-१६ कार्यक्रम अमेरिका-पाकिस्तान व्यापक द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. एफ-१६ ताफ्याद्वारे पाकला दहशतवाविरोधी मोहिमा राबविण्यास मोठी मदत मिळते. पाकने या विमानांचा वापर करून सर्व दहशतवादी संघटनांवर सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला.
भारताचे सावध मौन
बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर भारताने सावध मौन बाळगले आहे. अमेरिकेने याबाबत भारताला अधिकृतरित्या माहिती दिली अथवा नाही, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या मदतीमुळे पाकिस्तानी हवाई दलाला बळकटी मिळणार असून त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये अमेरिकेने पाकला ८ एफ-१६ विमाने विकण्याच्या निर्णयाला भारताने तीव्र विरोध केला होता.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |