09:46pm | Sep 22, 2021 |
सातारा : सातारा शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पोवई नाका ते वाढे फाटा या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय राष्ट्रीय मार्ग निधीतून 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गाच्या श्रेयवादावरुन सातार्यात पोष्टर वॉर सुरु झाले असून काम कोणाचं, नाचतंय कोण अशा आशयाचे बॅनर लागले असून त्यालाच प्रत्युत्तर म्हणून ‘काम आमचंच, म्हणून ठासून बोलतो’ असे बॅनर लावून नगरविकास आघाडी व सातारा विकास आघाडी मध्ये कलगीतुरा रंगला आहे.
पुढील काही महिन्यांत येवू घातलेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक विकासकामांच्या अनुषंगाने होर्डिंग व बॅनर मोठ्या दिमाखात झळकू लागले आहेत. ज्याठिकाणी बॅनर लागले आहेत, त्या बॅनर खालीच फुटभर खोलीचे खड्डे पडलेले आहेत, तर ठिकठिकाणी रस्त्यांची तसेच गटारांची दुरवस्था झालेली आहे. मात्र, जिल्ह्याचे हेडक्वार्टर असलेल्या सातारा पालिकेची सत्ता आपल्याच ताब्यात येण्यासाठी व आणण्यासाठी सातारा विकास आघाडी तसेच नगर विकास आघाडीकडून रंगीत तालीम सुरु झाली आहे.
पोवई नाका हे सातारा शहराचे नाक आहे, तर वाढे फाटा हा सातारा शहराचे प्रवेशद्वार आहे. परंतू वाढे फाटा ते पोवई नाकापर्यंत प्रवास करताना अरुंद रस्त्यामुळे तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे आपण खरेच सातारा शहरात प्रवेश करतो काय, असा अनेकांना प्रश्न पडतो. पुणे, सांगली तसेच कोल्हापूर ही शहरे सातारा शहराला लागून आहेत. परंतू या तिनही शहरांची प्रवेशद्वारे महानगराला साजेशी अशी आहेत. सातारा शहर मात्र त्याला अपवाद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातारा शहराची वाटचाल सुधारित खेड्यांकडे चाललेली आहे. सातारा शहरात राजकारणाचा सुकाळ असला तरी विकासकामांचा दुष्काळ आहे. असे असतानाच येवू घातलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विकासकामांच्या पोष्टरबाजीने जोर धरलेला आहे. गेली अनेक महिने मांडीखाली दाबून ठेवलेली लेटरहेड हळूहळू बाहेर निघू लागली आहेत.
कालच पोवई नाक्यासह शहरात ठिकठिकाणी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून केंद्रीय राष्ट्रीय मार्ग (सीआरएफ) निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या रस्त्याच्या कामाच्या भव्य शुभारंभासाठी आज दि. 22 रोजी 11 वाजताचा मुहूर्त होता. परंतू त्या अगोदरच नगर विकास आघाडीने काम कोणाचं, नाचतंय कोण... कधीतरी खरं बोला, असे म्हणत नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून आलेल्या पत्राचे बॅनरच सातारा विकास आघाडीने लावलेल्या बॅनरच्या बाजूला पोवई नाक्यासह सातार्यात ठिकठिकाणी लावले. त्यामुळे शहरात सकाळपासून या बॅनरबाजीची चर्चा होती. मात्र, नगर विकास आघाडीला उत्तर देत सातारा विकास आघाडीनेही सोशल मीडियावर पोष्टरबाजी केली असून ‘काम आमचंच... म्हणून ठासून बोलतो, तुमचं तर नेहमीचंच... नाचता येईना म्हणून आंगणच वाकडे... अरे आता तरी सुधरा’ असे म्हणत 24/7/2020 ते 25/8/2020 पर्यंतच्या संबंधित खात्याकडील पत्रव्यवहारांचेच फोटो बॅनरवर टाकल्याने वाढे फाटा ते पोवई नाका या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम नक्की कोणत्या आघाडीने केले, असा प्रश्न सातार्यातील सुजाण नागरिकांना पडलेला आहे. काम कोणीही करो, कामाचे श्रेय कोणीही घेवोत, मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण होवो, अशी अपेक्षा सातारकरांनी केली आहे. तत्पूर्वी पालिका निवडणुकीअगोदरच सातारा शहरातील सत्ताधारी व विरोधी आघाड्यांनी एकमेकांविरोधात केलेल्या बॅनरबाजीमुळे नागरिकांचे मनोरंजन झाले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |