12:04am | Apr 07, 2023 |
लोणंद : लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलावर एसटी व मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकलवरील तीन युवक जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खुर्द, तालुका पुरंदर, जि. पुणे येथील आहेत.
या अपघाताची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एम एच २० बी एल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटरसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये मोटरसायकलवरील अनिल नामदेव थोपटे (वय २५), पोपट अर्जुन थोपटे (वय २३) व ओंकार संजय थोपटे (वय २२, सर्व रा. पिंपरे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) हे तीनही युवक जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व त्यांच्या सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला करून सर्व मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या अपघाताची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |