05:23pm | Jan 25, 2022 |
कराड : येथील मलकापूर शहरातील शेतकऱ्यांसाठी अर्थवाहिनी असणारी मातृसंस्था श्री लक्ष्मीदेवी सोसायटीची निवडणूक मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध पार पडली. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्य मंत्री (शहरी) आ. सतेज उर्फ बंटी पाटील व कृषी राज्यमंत्री आ. विश्वजीत कदम यांनी संस्थेच्या सर्व नवनिर्वाचीत सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
श्री लक्ष्मीदेवी सोसायटीच्या नवनिर्वाचीत सदस्यांमध्ये सर्वसाधारण कर्जदार गटातून मनोहर भास्करराव शिंदे, अर्जुन श्रीरंग जगदाळे, विलास मारुती शिंदे, अशोक जगन्नाथ पाचुंदकर, संभाजी ज्ञानु थोरात, अधिकराव बळवंत जगदाळे, चंद्रकांत अंतु बागल, संभाजी श्रीपती (शंकर) शिंदे, तसेच इतर मागासप्रवर्ग गटातून आनंदराव दगडू सुतार, विशेष मागास प्रवर्गातून जयवंत शंकर येडगे, अनुसुचित जाती-जमाती गटातून शिवाजी पांडुरंग साठे, महिला राखीव गटातून श्रीमती सरिता रामचंद्र कदम व श्रीमती मनिषा विजय बोरगे यांची बिरविरोध निवड करण्यात आली आली.
स्व. प्रेमलाताई चव्हाण यांच्या सहकार्याने या सोसायटीची स्थापना 26 जून 1978 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर हनुमान दुध उत्पादक संस्था, गजानन नागरी सहकारी पतसंस्था आदी. संस्था कार्यान्वीत झाल्या. मलकापूर गावातील शेतकऱ्यांसाठी आर्थिेक उन्नती करणारी व शेती विकासासाठी काम करणारी श्री लक्ष्मीदेवी सोसायटी ही एकमेव संस्था आहे.
मलकापूरमधील शेतकरी बांधवांना शेतीसाठी सुलभरित्या पिक कर्ज मिळावे. तसेच शेती उपयोगी खते सहजरित्या उपलब्ध व्हावीत, यासाठी माजी आमदार स्वा.सै.कै. भास्करराव शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तात्कालिन गावातील जेष्ठ नागरिक कै. श्रीरंग जगदाळे, कै. बाजीराव बागल, कै. हिंदूराव साळुंखे, कै. बापूराव शिंदे, कै. विलास येडगे यांनी ही संस्था सुरु केली. त्यानंतर ही संस्था पुढच्या पिडीकडे सोपविण्यात आली असून सर्व कामामध्ये सभासदांचे मोलाचे सहकार्य होत आहे. या सोसायटीमार्फत शेतकरी बांधवांच्याबरोबरच शहरातील महिला बचत गट सक्षम व्हावेत, यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही संस्था सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासणारी असून संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व सभासद, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले असून त्यामध्ये सभासदांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे संस्थेच्या सभासदांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, सचिव विलास शिंदे, भागवत शिंदे, वसंतराव शिंदे, विष्णु फुके उपस्थित होते. तसेच गृहराज्य मंत्री (शहरी) आ. सतेज उर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री आ. विश्वजीत कदम यांनी संस्थेच्या सर्व नवनिर्वाचीत सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |
रस्ता अडविल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा |
महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांची धाड |