09:50pm | Aug 13, 2022 |
सातारा : सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि NAFSCOB यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्रीय सहकार मंत्रालय हे भारत सरकारच्या अंतर्गत मंत्रालय असून 6 जुलै 2021 रोजी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रीय सहकार मंत्रालयाचा देशातील सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक फ्रेमवर्क प्रदान करणे तसेच सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करण्याचा उद्देश आहे. तळागाळातील सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी, सहकारी संस्थांसाठी ’व्यवसाय सुलभ करण्यासाठी’ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि बहु-राज्यीय सहकारी संस्थांचा विकास सक्षम करण्यासाठी कार्य करते. याचे नेतृत्व केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शाह करीत आहेत.
सहकार मंत्रालय बळकट करण्यासाठी, पारदर्शकता आणण्यासाठी, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि स्पर्धात्मक सहकारी संस्था निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी विकासाच्या सुलभतेचे आव्हान पेलण्यासाठी सहकार मंत्रालय सतत काम करणार आहे. सहकार चळवळ वाढीसाठी अनेक बाबींची याप्रसंगी चर्चा झाली. विविध कार्यकारी विकास सेवा संस्थाचे संगणकीकरण करणेसाठी अर्थसहाय्य आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सर्वच प्रश्न सोडविणेकरिता हिरहिरीने सहभाग घेणेचे यावेळी अमित शह यांनी नमूद केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सहकारी बँकांना भेडसावणारे प्रश्न व सहकार संबंधी असणार्या विविध अडचणी संदर्भात विविध प्रश्नांची मांडणी केली.
सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र संपूर्ण देशातच चांगले काम करीत आहे, परंतु, काही आव्हानेही आहेत. सहकार क्षेत्राची वाढ देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठी क्रांती होत असून, अनेक आर्थिक सुधारणाही समाजाच्या हिताच्या दृष्टीने घडत आहेत. सहकार मंत्रालयाने देशातील 351 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची गेल्या दहा वर्षातील कामकाजाची माहिती घेऊन सातारा जिल्हा बँकेच्या गेल्या दहा वर्षातील सतत सर्वोत्तम व सर्वांगीण केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तज्ञ कमिटीने दशकातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेस सन्मानित केले आहे.
संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतकर्यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |