06:17pm | Apr 19, 2021 |
सातारा : कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीने जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यात सध्या अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणाच याला जबाबदार असून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध न झाल्यानेच बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे कोरोनामुळे होणारे मृत्यू नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणातून झालेले खून आहेत. याबाबत तात्काळ उपायोजना करा, अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी दिला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशासह राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासन फक्त लोकांच्या निष्काळजीपणावर खापर फोडून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करित आहे. रेमडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार, व्हेंटीलेर्सचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता तसेच बेड उपलब्ध नाहीत अशी परिस्थितीच सर्वसामान्यांना मृत्यूच्या दारात घेवून जात आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना करून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी पार पाडावी.
जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे चित्र सद्या उभे केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र शहरासह जिल्ह्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना जास्तीचे पैसे मोजून रेमडेसिवीरचे इंजेक्शन घ्यावे लागत असल्याचे वास्तव निदर्शनास येवू लागले आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही इंजेक्शन्स जिल्ह्यासाठी पाठवली होती. मात्र ती जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेली. त्यानंतर त्याचे संबंधितांनी पैसे भरलेही. इंजेक्शन मात्र उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या इंजेक्शनची काळ्या बाजारात जवळपास 10 हजार रूपये इतकी किंमत असल्याचेही जात आहे. केंद्र शासनाने जरी याची निर्यात थांबवली असली तरी सातार्यात मात्र तुटवडाच आहे. पर्यायाने रुग्णाला वेळेत हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
संकटकाळात योग्य उपायोजना करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली असली तरी जिल्ह्यातील स्टॉकिस्टची चौकशी कधी होणार? तसेच साठेबाजी करुन रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करणार्या साठेबाजांच्या मुसक्या प्रशासन कधी आवळणार, असा सवालही या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. याचबरोबर जिल्ह्यात पर्याप्त बेड, व्हेंटिलेटरची कमतरता असल्यामुळे नागरिकांना प्राणास मुकावे लागत आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सातारा यांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोना महामारी वर्षभर जिल्ह्यात थैमान घालत असतानाही आजच्या घडीला बेड, ऑक्सिजन, औषधाअभावी होणारे मृत्यू हे व्यवस्थेने घडवून आणलेले खूनच आहेत.
राज्य, केंद्र सरकार, प्रशासनच याला जबाबदार आहे. त्यामुळे जर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु. याला फक्त पालकमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील, असा इशाराही निवदेनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप, उत्तमराव सावंत, महेंद्र बाचल, विजयकुमार धोतमल, अॅड. इम्तियाज खान, अॅड. विकास साबळे, आसिफ पठाण, प्रा.चव्हाण, अतुल भोसले, विशाल कोळी, कुलदीप भोगावकर, प्रिया तोरस्कर, दिपेंती चिकणे, शिवाजी जाधव, अॅड. मंगेश महामुलकर, अॅड. भिसे, बापू सोरटे, संजय पवार, संदीप माने, डॉ.मधुकर माने, अॅड. विजय खामकर, संजय भोसले, सुनिल शिंदे यांची उपस्थिती होती.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |