12:48pm | Nov 24, 2022 |
पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगावात बिबट्याचा वावर समोर आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषत: पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील डोंगरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने अनपटवाडी, राऊतवाडी आणि सर्कलवाडी येथील ग्रामस्थांनी सावध राहावे, असे आवाहन वाठार स्टेशन वनपरिमंडळ अधिकाऱ्यांनी केले आहे.
याबाबत ग्रामपंचायतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की वाघोली नियत क्षेत्रामध्ये वनविभागाचे वनपाल व वनरक्षक हे अनपटवाडी, राऊतवाडी व सर्कलवाडी राखीव वनक्षेत्रात गस्त घालत असताना त्यांना पायवाटेने बिबट्याची मादी व तिच्या पिल्लांच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. काही ठिकाणी विष्टा दिसून आली आहे. दरम्यान, कोरेगाव आणि वाई तालुक्यांच्या सीमेवरील मुरा डोंगरात शेतकऱ्यांची जनावरे मोठ्या प्रमाणात चरण्यासाठी असतात, तसेच डोंगरपायथ्याशी शेती असल्याने लोकांचा सतत वावर असतो. बिबट्याच्या उपस्थितीमुळे वनविभागाने दिलेल्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
राखीव वनक्षेत्रात कोणीही जाऊ नये
अनपटवाडी, राऊतवाडी व सर्कलवाडी राखीव वनक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याने राखीव वनक्षेत्रात कोणीही जाऊ नये. वनक्षेत्रात पाळीव प्राणी चरण्यासाठी सोडू नयेत, बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत झाल्यास वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जात नाही, तसेच रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये.
जी. आर. निकम, वनपरिमंडळ अधिकारी
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |