09:15pm | May 04, 2023 |
सातारा : वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या दोन मैत्रिणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले टेंभू तालुका कराड येथे रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्यांनी त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापू, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजता सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला, तर वाढदिवस असलेली युवती आणि तिची मैत्रीण गाडगे महाराज विद्यालयासमोर सचिन कोळी याच्या कार मध्ये बसल्या. त्यानंतर सचिनने कार कृष्णा कॅनल वरून ओगलेवाडी रस्त्याने टेंभू गावाच्या हद्दीतील डोंगराकडे नेली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान निर्जन ठिकाणी कार थांबल्यावर संबंधित दोन्ही युवती व सचिन कोळी कारमधून उतरून बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक त्याठिकाणी तिघेजण आले. त्यांच्या हातात कोयते होते. एवढ्या रात्री तुम्ही इथे कशाला आला ? असे म्हणून तिघांनी सचिन कोळी व त्याच्यासह दोन युवतींना कोयत्याचा धाक दाखवला. एका युवतीच्या कानातील कर्णफुले व तिघांचे मोबाईल काढून घेतले. तिघांना कारमध्ये घालून लूटमार करणाऱ्यांनी कार डोंगराच्या दिशेने नेली. मात्र काही अंतरावर गेल्यावर डोंगराखालून बॅटऱ्यांचा उजेड दिसू लागल्यामुळे संशयितांनी कर्णफुले आणि तीन मोबाईल असा 72000 ऐवज लुटून तिथून पुढे काढला. त्यानंतर सचिन कोळी आणि त्या दोन्ही युवती पुन्हा कारमध्ये बसून डोंगरावरून खाली येत असताना युवतीचे पालक त्यांना रस्त्यात भेटले. पालकांना हा प्रकार समजल्यावर सर्वजण कराड तालुका पोलीस ठाण्यात आले. युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |