टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधील सातवा दिवस भारतासाठी आनंदी ठरला. बॉक्सिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लव्हलिन बोर्गोहेनने तैपईच्या निएन चिन चेनचा पराभव करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले.
लव्हलिन बोर्गोहेनने निएन चिन चेनवर ४-१ असा विजय मिळवला. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे. याआधी २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कास्य, २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने कास्य पदक जिंकले होते आणि आता लव्हलिने पदक निश्चित केले आहे. आता या पदकाचा रंग कोणता असेल, याची सर्वांना उत्सुकता आहे.
लव्हलिनने सुरुवातीच्या काळात फार संघर्ष केलाय. तिचे वडील टिकेन यांचे छोटे दुकान होते. लव्हलिनकडे ट्रकसुटसाठी देखील पैसे नव्हते. डायटसाटी देखील तिला संघर्ष करावा लागला होता.
लव्हलिनने २०१८ आणि २०१९ साली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकले होते तर पहिल्या इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य आणि दुसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१७ साली तिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक मिळवले होते.
पदकतालिकेत सध्या चीन १६ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कास्य पदकासह पहिल्या तर जपान १५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कास्य पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका १४ सुवर्ण, १६ रौप्य आणि ११ कास्य पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एका रौप्य पदकासह ४७व्या स्थानावर आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |