12:52pm | Aug 03, 2022 |
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय भवितव्याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. शिवसेनेच्या वतीन कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा बंडखोर करु शकत नाहीत, पक्षात पडलेली फूट हे दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. शिवसेना कोणाची, शिंदे गटाची की मातोश्री गटाची, आमदारांच्या अपात्रतेवर काय होणार, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. न्या. रमण्णा यांच्या पीठासमोर सुनावणी सुरु आहे.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काय?आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा बंडखोर करु शकत नाहीत. पक्ष फुटल्याचं बंडखोर आमदारांनी आयोगासमोर कबूल केलंय. बंडखोरांनी स्वतःहून मूळ पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडल्याचं सदस्यांच्या वर्तनाने सिद्ध झालं आहे. पक्षाच्या बैठकीला जाण्याऐवजी बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटीला गेले. तिथून त्यांनी गटनेता बदलल्याचं विधानसभा उपाध्यक्षांना कळवलं. घटनेची दहावी सूची याला परवानगी देत नाही. पक्षात फूट हे दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे, असं सिब्बल म्हणाले.
पक्षांतराला प्रोत्साहन देण्यासाठी दहाव्या सूचीचा वापर केला जात आहे. असं सुरु राहिल्यास कोणत्याही राज्यातील सरकार पाडणं शक्य होईल, असंही सिब्बल म्हणाले. बंडखोर अपात्र असतील, तर आतापर्यंतच्या सर्व प्रक्रिया अवैध ठरतील. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, त्यांचा शपथविधी, नव्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय अवैध असतील, असं सिब्बल यांनी सुचवलंय.
दोन तृतीयांश आमदार असतील, तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात किंवा नवा पक्ष स्थापन करु शकतात, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं असता, तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावं किंवा नवा पक्ष स्थापन करावा का? असं कोर्टाने विचारलं, तेव्हा, त्यांच्यासाठी केवळ हाच बचाव शक्य आहे, असं उत्तर सिब्बल यांनी दिलं.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |