09:29pm | Jan 31, 2021 |
कराड : एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चारचाकी गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात चारजण ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुर महामार्गावर कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत अटके टप्प्याजवळ रविवार (दि. 31) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्या रस्त्याकडेच्या नाल्यातून बाजूच्या झाडांवर जावून आदळल्या. अपघातातील सर्वजण पुणे येथील असल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. त्या दोन्ही गाड्या कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अटकेटप्पा येथे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. तसेच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना उपचारासाठी त्वरीत कराड येथील रुग्णालयात पाठविले. अपघात स्थळी दोन्ही गाड्यांच्या काचा पडल्या होत्या. तर मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. अपघातातील सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्री उशीरापर्यत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |