12:13pm | Jun 17, 2022 |
नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या खाद्यतेल कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट केली आहे. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी आणि पामतेल, यात थेट विक्री दरातही घट होणार आहे. 5 रुपये ते 15 रुपयांपर्यंत ही घट असणार आहे. यामुळे महागाईने त्रासलेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.
खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमतीत साधारण 15 रुपयांपर्यंत घट केली आहे. थेट विक्री दारतही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीत घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची पुष्कळ उपलब्धता यामुळे हे दर कमी झालेत. पामतेलाच्या दरातही प्रतिलीटर साधारण 7 ते 8 रुपयांची घट झाली. तसेच, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या किंमतीत प्रतिलीटर 10 ते 15 रुपयांची घट झालीय. तर सोयाबीन तेलाचे दर प्रतिलीटर 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
दरम्यान, फॉर्च्युन कंपनीच्या तेलात देखील लवकरच घट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, जेमिनी तेलाच्या दरातही 15 रुपयांची घट झाली आहे. आणखी 20 रुपये कमी होण्याची शक्यता देखील आहे. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकारने खाद्यतेलावरचे आयात शुल्कही कमी केले आहे. याचा परिणाम तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |