03:29pm | May 24, 2022 |
सिंधुदुर्ग : मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. येथील समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट उलटली. ही बोट समुद्रात उलटली तेव्हा त्यामध्ये २० जण होते. यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर २० जणांना घेऊन ही बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथू परत येताना घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरु झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. मात्र, बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तारकर्लीचा समुद्रकिनारा हा स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. या दुर्घटनेमुळे सध्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.
स्थानिक प्रशासनाकडून या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बोटीची प्रवाशी क्षमता किती होती, दुर्घटना घडली तेव्हा पर्यटकांना लाईफ जॅकेटस देण्यात आली होती का, याचा सध्या तपास केला जात आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |