09:46pm | Jun 08, 2021 |
वाई : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेंन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस पाच लाख पंधरा हजार ९१५ ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये रक्कम भरण्याचे आदेश वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिले आहेत.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील पुणे-सातारा रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत साताऱ्यात खंबाटकी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या कंपनीस ठेकेदार म्हणून नेमण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या गौण खनिज उत्खनना प्रकरणी स्वामित्वधन व दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास तहसीलदार रणजीत भोसले व सातारा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी बजावली होती. या नोटिस विरोधात संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन नोटीस रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. हे सरकारी काम असून या ज्या गटातून हे उत्खनन केले जात आहे त्याच गटात हे वापरले जाणार आहे. त्यामुळे शासनाचे गौणखनिज स्वामित्वधन व दंडाची रक्कम आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे न्यायालयाने या नोटिसा रद्द कराव्यात व स्वामित्वधन दंडाची रक्कम माफ करावी, अशी मागणी ठेकेदाराने न्यायालयाकडे केली होती. सुनावणीदरम्यान हे आदेश नसून नोटीस आहेत व यासाठी तहसीलदार वाई यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंपनीने आपले म्हणणे त्यांच्याकडे सादर करावे. तसेच तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे एकूण घेऊन योग्य ते आदेश पारित करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने तहसीलदार रणजित भोसले यांना निर्देश दिले होते. याप्रमाणे मे २०२१ मध्ये तहसीलदार वाई यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधित कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदर गौणखनिज उत्खनाचे स्वामित्व धन व दंडा पोटी संबंधित कंपनीला ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांनी ठेकेदार कंपनीला दिले आहेत. या आदेशामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |