सातारा : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
राजेश सुखदेव चाैगुले, संभाजी मोहन जाधव (दोघेही रा. अतीत, ता.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, खिंडवाडी, ता. सातारा येथे हे दोघे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला कारवाइच्या सूचना दिल्या. या टीमने खिंडवाडी येथे बुधवारी या दोघांना पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, दोघे पळून जात असतानाच पोलिसांनी दोघांना शिताफीने पकडले. त्यांच्या ताब्यातून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, एका मोटारसायकल चोरीची अद्याप पोलिसांना माहिती मिळाली नाही. या दुचाकीबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या सुचनांप्रमाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आंनदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ सपकाळ आदींनी या कारवाईत भाग घेतला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |