02:10pm | Jan 22, 2021 |
वाई: आनेवाडी (ता.जावली) टोल नाका येथील टोल हस्तांतर आंदोलनप्रकरणी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले व इतर 11 समर्थकांची वाई न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
दि.5 ऑक्टोबर 2017 रोजी संध्याकाळी सहा वाजता आनेवाडी टोल नाका येथे खासदार खा. श्री.छ.उदयनराजे, अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. आनेवाडी टोल नाका येथे 250 जणांचा बेकायदेशीर जमाव जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा व टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे बोलून टोल हस्तांतरणास विरोध केला होता.
यावेळी टोल नाक्यावर टोलनाका हस्तांतर वरून टोलवसुली हस्तांतर आवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी टोल नाका परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. यावेळी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची सुनावणी वाई येथील न्या. एम.एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. अंतीम सुनावणीनंतर खा.श्री.छ.उदयनराजे व त्यांच्या 11 सहकार्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी आज न्यायालयात खासदार श्री.छ. उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर खा.श्री.छ.उदयनराजे व इतरांच्या वतीने अॅड. ताहेर मनेर यांनी काम पाहिले. खा.श्री.छ. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |