08:56pm | Mar 10, 2022 |
नवी दिल्ली : पाच राज्याच्या निवडणुकांच्या निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपला करिष्मा कायम ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पहायला मिळेल. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. तिकडे पंजाबच्या निकालाने पूर्ण राजकारण बदललंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.
उत्तरप्रदेश निवडणूक निकाल
सर्वात मोठी लढाई उत्तर प्रदेशची होती. जी भाजपने जिंकलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तिकडे बसपा तिसर्या स्थानी तर कॉंग्रेस चौथ्या स्थानी पोहोचले आहे.
गोवा निवडणूक निकाल
गोव्यात भाजप सलग दुसर्यांदा सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून बहुमतासाठी दोन जागांची गरज आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिलं आहे. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु झाली आहेत. त्यामुळे आता भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंजाब निवडणूक निकाल
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी कॉंग्रेससह भाजपचाही सुपडासाफ केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आप आले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत पंजाबच्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.
उत्तराखंड निवडणूक निकाल
उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा पहायला मिळाली. दुसरीकडे, कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मणिपूर निवडणूक निकाल
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुतेक निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.
एकंदरीत पाहता पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व राखलेल्या चार राज्यांवर त्यांचे निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून आले आहेत. तर पंजाबमध्ये आप ने एकहाती सत्ता घेवून भल्याभल्यांना पाणी पाजले आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |