सातारा : रामनगर, ता. सातारा येथे एकाला मारहाण करुन दुखापत केल्या प्रकरणी तेथीलच सहा जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.11 रोजी 11.17 वाजण्याच्या सुमारास रामनगर, ता. सातारा येथील रेखा मिठारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून प्रकाश विजय काळे, अनिल विजय काळे दोघेही रा. रामनगर, ता. सातारा, वैजू लाभू काळे यांनी फिर्यादी विक्रम टपू मिठारे रा. रामनगर, ता.सातारा यांना व त्यांचा मुलगा अजय या दोघांना विटेचे तुकडे फेकून मारले. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच किरण मिठारे यांची कोंडवे गावच्या हद्दीत दुचाकी अडवून त्यांना मारहाण करून दुचाकीचे नुकसान केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर वरील तीन जणांसह आदिक वैजू काळे, एकनाथ वैजू काळे रा. आळंदी, जि. पुणे, सख्या विक्रम गारोळे रा. कोरेगाव, ता. सातारा या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून वैजू लाभू काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दि. 11 रोजी 4.35 वाजण्याच्या सुमारास रामनगर येथे वैजू काळे यांची मुले प्रकाश काळे व त्यांच्या घरातील लोकांसोबत बोलत असताना वैजू काळे यांचा चुलत भाऊ प्रकाश काळे व स्नेहा किरण मिठारे यांच्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, चिडून जाऊन वैजू काळे याला अनिल मिठापुरे यांनी दगड मारून जखमी केले. एकनाथ काळे यालाही मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |