08:28pm | Jan 15, 2021 |
सातारा : सातारा जिल्ह्याच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मेडीकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित देशमुख यांचे जिल्हावासियांच्यावतीने आभार मानले आहेत.
गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला मुंबई येथे दोन दिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांची भेट घेवून सातारा जिल्ह्याचा मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरुन ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६१ कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला ना. पवार यांनी प्राधान्य देत सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढला. ना. अजित पवार आणि ना. अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विध्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी व अनुषांगिक बांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली असून त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हावासियांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून सातारा जिल्हावासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. देशमुख यांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |