03:08pm | Jan 16, 2021 |
सातारा: कोरोना संसर्गामुळे देशाबरोबर राज्याचे अर्थचक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले त्याचबरोबर सर्वांनाचा याचा त्रास झाला. आज देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. यामुळे देशासह राज्यात आज उत्साहाचे वातरण असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
स्व.क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती बाळासाहेब विष्णू खरमाटे, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसर्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसर्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यातील 9 ठिकाणी देण्यात येणार असून या 9 ठिकाणी प्रत्येक दिवशी 100 लाभार्थ्यांनाच लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर 30 मिनिटे निरीक्षणही करण्यात येणार. लसीमुळे आज आरोग्य क्षेत्रात काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत असल्याच्या भावना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी बोलून दाखविल्या. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लसीकरण प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची पहाणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
लसीकरणाचा मला आज लाभ मिळाला. त्याबद्दल मला आनंद वाटत आहे. मला कसलाही त्रास जाणवत नाही, यापुढे कोरोना मुक्तीच्या कासाठी आणखीन जोमाने काम कर, असा विश्वास जिल्ह्यातील पहिली करोना प्रतिबंधक लस घेणार बाळासाहेब विष्णू खरमाटे, क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी यांनी व्यक्त केला.
कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ
उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपथित संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती फलटण येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होत्या.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |