03:14pm | Oct 29, 2022 |
जयपूर : राजस्थानमध्ये जगातील सर्वात उंच अशा भगवान शंकराच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. भगवान शंकराची ही प्रतिकृती जगातील सर्वात उंच म्हणजेच तब्बल 369 फुट उंच आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या उंच शिवप्रतिमेला 'विश्वास स्वरूपम' नाव देण्यात आलं आहे.
‘विश्वास स्वरूपम’ प्रतिमेचं लोकार्पण आज होणार आहे. हा कार्यक्रम 29 ऑक्टोबरपासून 06 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या भव्य मूर्ती लोकार्पणाचा कार्यक्रम प्रसिद्ध कथावाचक मुरारी बापू, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या परिसरात नऊ दिवस मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
राजस्थानमध्ये 369 फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे आज लोकार्पण होणार आहे. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा शहरात ही भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीला ‘विश्वास स्वरूपम’ असं संबोधलं जात आहे. नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. 2012 साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे.
या भव्य मूर्तीमध्ये लिफ्ट, जिने, हॉल बांधण्यात आला आहे. या मूर्तीचे काम पूर्ण होण्यासाठी 10 वर्षे लागली. यासाठी 3000 टन स्टील आणि लोखंड तसेच 2.5 लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे. ऑगस्ट 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुरारी बापू यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर आता या मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. नाथद्वारामधील ‘विश्वास स्वरूपम’ मूर्तीचं हे ठिकाण उदयपूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे.
संत कृपा सनातन संस्थान द्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीचं बांधकाम ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कंपनीने मिळून केले आहे. या मूर्तीमध्ये चार लिफ्ट आहेत. या लिफ्टच्या साहाय्याने तुम्ही 270 फुट उंचीवर शंकराच्या डाव्या खांद्यावरील त्रिशूळवरून पाहता येईल. 369 फुट उंट या मूर्तीमध्ये एका वेळी सुमारे 10 हजार लोक राहू शकतात.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |