01:33pm | Jul 02, 2020 |
कोलंबो: 2011 वर्ल्ड कप सामन्याप्रकरणी संगकाराला समन्स बजावण्यात आला आहे. 2011 साली भारतात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना फिक्स झाला होता. या प्रकरणी श्रीलंकेत सुरू असेलल्या तपास पथकाने माजी कर्णधार कुमार संगकारा याला समन्स बजावले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 विकेटनी पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या या विजेतेपदावर श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यावेळी महिंदनंदा अळूठगमगे हे लंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत वर्ल्ड कपमधील हा सामना फिक्स झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2011च् या लंकेच्या वर्ल्ड कप समितीचे प्रमुख असेलल्या अरविंदा डिसिल्वाने याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या आरोपांच्या पाश्वभूमीवर लंकेच्या क्रीडा मंत्रालयाचे सचिव केडीएस रुवानचंद्रा यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणी काल माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती प्रमुख डिसिल्वा आणि माजी फलंदाज उपल तरंगा यांची साक्ष घेण्यात आली. आता आज पोलिस कुमार संगकाराची साक्ष नोंदवणार आहेत.
भारताकडून पराभव झालेल्या अंतिम सामन्यात संगकारा श्रीलंकेचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करत त्यांनी 275 धावांचे आव्हान दिले होते. भारताने गौतम गंभीर (97) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 91) यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. काल डिसिल्वाची चौकशी पथकाकडून तब्बल सहा तास चौकशी केली. डिसिल्वा हे 2011च्या श्रीलंकेच्या संघाचे मुख्य निवड समितीचे प्रमुख होते.
अळूठगमगे यांनी अंतिम सामना फिक्स झाल्याचा आरोप केला होता तेव्हा संगकाराने ते आरोप फेटाळून लावले होते. त्याने अळूठगमगे यांच्याकडून फिक्सिंग झाले असल्यास त्याचे पुरावे द्या अशी मागणी केली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |