04:38pm | Jul 16, 2020 |
नवी दिल्ली: संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनावरील लस शोधण्याचे कामही जगभर सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतात कोरोनावरील लस निर्माणात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केले आहे.
रशिया, अमेरिका यांसारख्या देशांना सुरूवातीच्या टप्प्यात यात यशही मिळालं आहे. भारतातदेखील शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करून लस विकसित करण्याचं काम करत आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा भारताची स्तुती केली आहे. भारतातील औषध उद्योग केवळ आपल्या देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी करोनावरीस लस तयार करण्यास सक्षम आहे. भारतात करोनाची लस विकसित करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या एक महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत, असं बिल गेट्स म्हणाले.
भारतात औषधं आणि लस तयार करणार्या कंपन्या अनेक कंपन्या आहेत ज्या संपूर्ण देशाला मागणीनुसार पुरवठा करू शकतात. जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक लसींची निर्मिती होते हे आपल्याला माहितच आहे. सीरम इन्स्टीट्युट यात आघाडीवर आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
भारतात बायो ई आणि भारत बायोटेकसारख्या अन्य कंपन्यादेखील आहेत. या कंपन्या देशात करोनाची लस तयार करण्यासाठी काम करत आहे, असं ते म्हणाले. जागतिक पातळीवर लस निर्माण करणार्या देशांच्या समुहात भारत सामिल झाला आहे. भारतातील औषध उद्योग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी औषधांचं उत्पादन करण्यास सक्षम असेल. यामुळे आपल्याला मृत्यूंची संख्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत मिळणार आहे. अशा प्रकारे आपण ही महामारी संपवू शकतो, असंही गेट्स यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |