कराड : जखिणवाडी (ता.कराड) येथील प्रगतशील शेतकरी मारुती केरु पावसे यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडीत पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले. नाशिक येथील समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मारूती पावसे यांनी शेतीत सुरुवातीस भाजीपाला, पानमळा या यशस्वी पीक पद्धतीतून उत्पन्न घेतल्यानंतर ते फळबाग लागवडीकडे वळले. याकामी कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. चिक्कू, पेरू, साई सरबती लिंबू, नारळ ही फळ पिके उत्पादीत करून शेतकरी ते थेट ग्राहक ही योजना त्यांनी प्रभावीपणे अवलंबत शेतीत प्रगती साधली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा उद्यान पंडीत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे, ना. छगन भुजबळ, कृषी मंत्री ना. दादा भुसे, राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मारूती पावसे यांना शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग, कालवडे कृषी विज्ञान केंद्र, डॉ. शिवाजीराव ठोंबरे व ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे मार्गदर्शन लाभले.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी संचालक डॉ.नारायण शिसोदे, माजी संचालक डॉ.सुदाम अडसूळ, महावीर जंगटे, झेंडे, कृषी विस्तार संचालक विकास पाटील, कैलास मोथे, दशरथ तांबाळे, डॉ.चांगदेव बागल, सातारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, दौलत चव्हाण, दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, डॉ. शिवाजीराव ठोंबरे, ज्ञानदीप संस्थेचे आनंदा थोरात, सुनिल ताकटे, मंडळ कृषी अधिकारी भोसले, किरण कांबळे, विनोद पुजारी, सौ.ज्योती शिंदे, ग्रामसेवक सदाशिव खांडके यांनी अभिनंदन केले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |