बुध: कोविड-19 मुळे जगभर शाळा बंद झाल्या. शिक्षक व पालक यांचेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ऑनलाईन शिक्षणाचे माध्यमातून शिक्षण सुरु झाले. याच ऑनलाईन शिक्षणातून शिक्षण क्षेत्रात भविष्यात शिक्षणक्रांती घडेल, असे मत प्रतिपादन जिल्हा परिषद शाळा निरगुडी ता.फलटण जि.सातारा मधील प्रयोगशील तंत्रस्नेही पदवीधर शिक्षक अभिजित रणवरे यांनी प्राथमिक शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख अनिल कदम होते. प्रमुख पाहुणे फलटण गटसाधन केंद्राच्या विषय तज्ज्ञ दमयंती कुंभार होत्या. सदरची ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण व पंचायत समिती, फलटण शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती.
या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अभिजित रणवरे पुढे म्हणाले की, कोविड आपत्तीमुळे शाळा बंद आहेत. पण शिक्षण सुरु आहे. शिक्षक ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीचा वापर करून शिकवत आहेत. या शिक्षणास गती मिळावी. प्रभावी व परिणामकारक शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. ऑनलाईन शिक्षणाने शिक्षक, बालक व पालक नवतंत्र व नवीन तांत्रिक शिक्षण आत्मसात करीत आहेत. त्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा उपयोगी ठरतील. याच ऑनलाईन शिक्षणातून भविष्यात शिक्षणक्रांती घडेल.
या वेळी ई-मेल आयडी तयार करणे, गुगल मीट द्वारे मिटींग तयार करणे, सादरीकरण करणे, ऑनलाईन अध्यापन करणे, पालक सभा ऑनलाईन घेणे, झूम अॅप मिटींग तयार करणे, पीपीटी व व्हिडीओ तयार करणे, युट्युब व दिक्षा अॅपचा वापर अध्यापनात करणे या विविध शैक्षणिक तंत्रस्नेही व ऑनलाईन शिक्षणास पूरक तांत्रिक बाबीचे कृति, प्रात्यक्षिक, सराव याव्दारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा मार्गदर्शन करणेत आले.
या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक अभिजित रणवरे, सुनिल तिवाटणे, उमा भोसले यांनी मार्गदर्शन केले. स्वागत राजेंद्र वाघ यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद केमधरणे यांनी केले. आभारप्रदर्शन तृप्ती परदेशी यांनी केले. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेस गिरवी, निरगुडी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा, चाहुरमळा, माळेमळा, हराटीमळा, गुरवदरा, जननीमळा या जिल्हा परिषद शाळा मधील मुख्याध्यापक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक ऑनलाईन हजर होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |