11:44am | Mar 16, 2022 |
कराड : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कराड तालुक्यातील विविध गावातील 'माझी वसुंधरा व जलजीवन मिशन' अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
बनवडी, ता.कराड येथे मंगळवार दि. 15 रोजी सकाळी भेट देऊन माझी वसुंधरा अभियानांतर्गत जल, वायु, अग्नि, भूमी, आकाश या निकषांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने केलेली तयारी व कामांचा आढावा घेऊन सातारा जिल्ह्यात बनवडी ग्रामपंचायतीची निवड होण्याकरिता मार्गदर्शन केले. त्यानंतर अनुक्रमे यशवंतनगर व वराडे येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा विहिरीच्या काम व उपांगाची पाहणी करून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच तालुक्यातील मालखेड व सुपने येथे जलशुद्धीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, दाबनलीका तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत सार्वजनिक, व्ययक्तीक शोषखड्डे व नडेपचे पूर्णात्वास असलेल्या कामाबदल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः हातपंप स्त्रोताचे फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून पाणी गुणवत्ता तपासणी केली. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंड बांधकामाची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुनील बसुगडे, शाखा अभियंता शुभांगी कुंभार, पाणी गुणवत्ता जिल्हा तज्ञ राजेश भोसले यांच्यासह संबंधित गावातील संरपच, ग्रामसेवक उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |