02:35pm | Jan 16, 2021 |
सातारा: सोमवार दि.18 रोजी शाहू क्रीडा संकुल येथे ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी होणार आहे. या परिसरातील संभाव्य वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून शहरातील वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अधिसूचना जाहीर केली असून शहरातील वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आल्याची माहिती सातारा शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.ए.शेलार यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी श्री. छत्रपती शाहू क्रिडा संकुल येथे होणार असल्याने परिसरातील वाहनधारकांच्या व पादचार्यांच्या सुरक्षिततेच्या तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व वाहतूक सुरळीत, सुरक्षित होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे नियमन करणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा शहरातील श्री. छत्रपती शाहू क्रिडा त संकुल परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेसाठी व वाहनांचे पार्किंग व्यवस्थेकरीता दि.18 जानेवारी सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत अधिसूचना जारी करुन वाहतूक मार्गातील ताप्तुरते बदल केले आहेत.
त्यानुसार सातारा श्री. छत्रपती शाहू क्रिडा संकुलकडे जाणारा मार्ग हा सुभाषचंद्र बोस चौक, एस.टी.स्टँंड इनगेट येथून मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांकरीता वाहतूकीसाठी बंद राहणार असून पर्यायी मार्ग म्हणजे मेढा, महाबळेश्वर, जुना हायवे मार्गे येणार्या सर्व एस.टी.बसेस तसेच सर्व वाहने एस.टी.स्टँड येथे जाणेकरीता भु विकास बँक-जुना आर.टी.ओ चौक मार्गे ये-जा करतील. वाढेफाटा मार्गे येणारी सर्व वाहने एस.टी.स्टँड येथे जाणेकरीता जुना आर.टी.ओ. चौक येथून पारंगे चौक मार्गे ये-जा करतील एस.टी.बसेस पारंगेचौक येथून एस.टी.स्टैंड इनगेट मार्गे ये. जा करतील इतर सर्व वाहने पारंगेचौक येथून पोवईनाका तहसिलदार ऑफिस मार्गे एस.टी.स्टेंड येथे ये-जा करतील. बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराज फाटा येथून मोळाचा ओढाकडे जाणारे सर्व वाहनांनी राधिका रोड मार्गाचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.
तसेच वाहनांचे पार्किंगसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार पी.1 म्हणजेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दुचाकी/चारचाकी करीता एस.टी.स्टँड समोर असणारे महसुल विभागाचे पार्किंग जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. पी.2 म्हणजेच ग्रामपंचायत निवडणूक निकालकरीता आलेल्या नागरीकांचे सर्व प्रकारचे वाहना करीता पूर्वीचे भु विकास बँकचे मोकळे मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक यांनी जारी केलेल्या अधिसुचनेची अंमलबजावणी करण्याकरीता व सुरक्षित, सुरळीत वाहतूकीकरीता वर नमुद केले बदलाप्रमाणे वाहनधारकांनी आपली वाहने नियोजित रस्त्यांने घेवून जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक, व्ही.ए.शेलार यांनी केले आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |